Surprise Me!

अक्षय्य तृतीया 2025; सोने खरेदी करण्यासाठी जळगाव सुवर्ण नगरीमध्ये ग्राहकांची गर्दी

2025-04-30 5 Dailymotion

<p>जळगाव: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. 'अक्षय' म्हणजे 'कधीही कमी न होणारा' आणि 'त्रितिया' म्हणजे 'तिसरा दिवस'. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो.अक्षय्या तृतीयानिमित्त सोने खरेदी करण्यासाठी जळगाव सुवर्ण नगरीमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळला. तर सोन्याच्या भावात गेल्यावर्षी तुलनेत २४ हजारांची वाढ होऊनही सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधला आहे. सोन्याचे भाव हे विक्रमी दरावर पोहोचल्यानं ग्राहकांना मात्र, सोने खरेदी करण्यासाठी तडजोड करावी लागत आहे. गेल्या वर्षी सोने जीएसटीसह ७६ हजार ७०० रुपये भाव होता. सध्या सोने ९६ हजार ६०० रुपये प्रति तोळा आहे. जीएसटीसह एक तोळे सोने घेण्यासाठी ९८ हजार रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती, सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी दिली.</p>

Buy Now on CodeCanyon