Surprise Me!

VIDEO : संतापजनक! परळीतील वैद्यनाथ मंदिरात मांसाहरी अन्न शिजवलं, भाविकांमधून संताप व्यक्त

2025-06-01 12 Dailymotion

<p>बीड : परळीतील वैद्यनाथ मंदिर (Vaijnath Temple) परिसरात सध्या तीर्थक्षेत्र विकासाची बांधकामे सुरु आहेत. मात्र, वैद्यनाथाच्या पूर्व प्रवेशद्वारावरच कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी चक्क पूर्व पायऱ्यावरील नियोजित दर्शन मंडपातच चूल मांडून आम्लेट आणि मांसाहरी अन्न शिजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी योगेश पांडकर यांनी हा सर्व प्रकार कॅमेरात कैद केला आहे. मंदिर परिसरात काम करताना ऐतिहासिक, धार्मिक महत्व लक्षात घेवून कामे करावी अशा वारंवार सूचना लोकप्रतिनिधी देत असतात. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याच इमारतीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांबाबत संबंधित गुत्तेदाराला खडेबोल सुनावले होते. या घटनेनंतर भाविकांमधून संताप व्यक्त केला जातोय. याबाबत कारवाई काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.</p>

Buy Now on CodeCanyon