Surprise Me!

पाणीपुरीचं सामान तयार करण्यासाठी रिक्षातून जाताना दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, मृतात शिवसेना महिला शहर प्रमुखाच्या पतीचा समावेश

2025-06-04 14 Dailymotion

<p>जळगाव : शहराजवळील निमखेडी शिवारात बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर शिवदे आणि प्रमोद शिवदे अशी मृत बांधवांची नावे आहेत. निमखेडी इथल्या कांताई नेत्रालयाजवळ अज्ञात वाहनानं ज्ञानेश्वर आणि प्रमोद यांच्या रिक्षाला अज्ञात वाहनानं धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षाचा चक्काचूर झाला.  मृत ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते. तर प्रमोद हे त्यांचे दीर होते. एकाच अपघातात सख्या भावांचा मृत्यू झाल्यानं शिवदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्ञानेश्वर शिवदे आणि प्रमोद शिवदे हे दोघेही पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. नेहमीप्रमाणे पाणीपुरीचं सामान तयार करण्यासाठी ते शिवाजीनगर इथल्या जुन्या घरी जात असताना अपघात झाला. अपघातानंतर मयतांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले.  </p>

Buy Now on CodeCanyon