Surprise Me!

वाळू माफियांनी केलेल्या बेदम मारहाणातील 35 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू, दोघांना अटक

2025-06-10 48 Dailymotion

<p>जालना : वाळू माफियांनी घरामागं साठवलेल्या वाळूमुळं रहदारीसाठी अडचण होत असल्याची तक्रार देण्यासाठी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गेलेल्या तरुणासह त्याच्या दोन भावंडांवर वाळू माफियांनी हल्ला केला. या घटनेत 35 वर्षाच्या तरुणाचा डोक्यात वीट लागून मृत्यू झाला. परमेश्वर सोनुने असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. जालन्यातील जाफ्राबाद पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली. मयत तरुण जाफ्राबाद तालुक्यातील सावरखेडा गावचा रहिवासी आहे. या घटनेनंतर जखमीला जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी जाफ्राबाद पोलिसांनी आरोपी राजू सोनुने आणि विजय सोनुने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. वाळू माफियांची तक्रार करण्यासाठी पोलिसांत गेलेल्या तरुणाला वाळू माफियांसोबत पोलिसांनीही मारहाण केली. त्यामुळं तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मयताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातवाईकांनी घेतला होता.</p>

Buy Now on CodeCanyon