Surprise Me!

श्री संत मुक्ताई यांच्या पालखीनं चढला बुलढाण्यातील प्रसिद्ध राजुर घाट; संत मुक्ताबाईंच्या पालखीचं 318 वे वर्ष

2025-06-11 8 Dailymotion

<p>बुलढाणा : आषाढी एकादशी वारीसाठी श्री संत मुक्ताई यांच्या पालखीनं 6 जूनला कोथळी मुक्ताईनगरातून जुन्या मंदिरातून पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. पालखीनं प्रस्थान केल्यानंतर मलकापूर मोताळा या मार्गे राजुर घाटामध्ये संत मुक्ताई यांची पालखी पोहोचली. प्रस्थान करताना हरिनामाच्या जयघोषानं राजुर घाट दुमदुमला. मंगळवारी सकाळी पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो.  संत मुक्ताई यांच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. संत मुक्ताई संस्थानच्या वतीनं दरवर्षी दिंडी काढण्यात येते. दिंडीचं हे 318 वं वर्ष आहे. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताई यांच्या दिंडीला आहे. संत मुक्ताई यांची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत 'विठू-रखुमाई'च्या नामघोषात 28 दिवसांत 1600 किलोमीटरचं अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते.</p>

Buy Now on CodeCanyon