Surprise Me!

गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणी अंदाज समितीच्या 12 आमदारांना आरोपी करा; अनिल गोटे यांची मागणी

2025-06-15 4 Dailymotion

<p>धुळे : धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या 1 कोटी 84 लाख 84 हजार रूपये प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई होत नसल्यानं माजी आमदार अनिल गोटे आक्रमक झाले आहेत. "एवढी मोठी रक्कम सापडल्यानंतर देखील धुळे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. प्रशासनानं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे धंदे बंद करावेत. तसंच याप्रकरणी खंडणी देणाऱ्या आणि गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तरी कारवाई करणारा आहात का?" असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केलाय. "या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांचे सचिव, पोलीस महासंचालक तसंच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडं लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणातील सर्व 12 आमदारांना आरोपी करावं, अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.</p>

Buy Now on CodeCanyon