<p>पुणे : दौंड-पुणे धावणाऱ्या शटल डेमो रेल्वेला आग लागल्याची घटना आज (16 जून) सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला. दौंड तालुक्यातील यवत स्टेशन लगत ही आग लागल्याची माहिती आहे. ही रेल्वे दररोज दौंड येथून 7 वाजून 5 मिनिटाला सुटते. इंजिनपासून तिसऱ्या डब्यातील शौचालयाला ही आग लागल्याची माहिती प्रवाशांकडून मिळाली आहे. डेमो रेल्वेच्या या डब्यामध्ये आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले, यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होतं. शौचालयात एक प्रवासी अडकला होता. त्याला इतर प्रवाशांनी दरवाजा तोडून बाहेर काढले. यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी एकूणच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.</p>