Surprise Me!

शाळेच्या पहिल्याच दिवशी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं विद्यार्थ्यांचं स्वागत

2025-06-16 2 Dailymotion

<p>दौंड (पुणे) - आज शाळेचा पहिला दिवस असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड तालुक्यातील आलेगाव येथे जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. अजित पवार यांच्यासमवेत काही कार्यकर्ते देखील होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत दौंड मधील शाळांना भेटी दिल्या . महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने "शाळा प्रवेशोत्सव" हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम दौंड तालुक्यातील विविध जि प शाळांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या निमित्ताने दौंड तालुक्यातील आलेगाव, धुमाळवस्ती (पुनर्वसन) येथील जि प शाळांना भेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्वागत केले. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते वीरधवल जगदाळे हे देखील उपस्थित होते.</p>

Buy Now on CodeCanyon