Surprise Me!

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पुण्याकडं प्रस्थान; हजारो वारकऱ्यांचा सहभाग

2025-06-20 16 Dailymotion

<p>पुणे : आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरण असतं. येत्या 6 जुलैला आषाढी एकादशी आहे.  आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरला जातात. अवघाची संसार सुखाचा करीन... आनंदे भरीन तिन्ही लोक... जाईनगे माये तया पंढरपुरा... भेटेन माया आपुलिया... संत ज्ञानेश्वर महाराजांनी कमी शब्दात जीवनाचं वर्णन केलेल्या याच त्या ओळी. ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुरूवारी आळंदीतून पंढरपूरकडं मार्गस्थ झाली. सकाळी सात वाजता आळंदीतील माउलींच्या आजोळ घरातून पुण्यभूमी पुणे शहराकडं माऊलींनी प्रस्थान ठेवलं. दिवसातील पहिला विसावा संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पाऊदका इथं तर रात्रीचा मुक्काम पालखी विठोबा मंदिर पुणे इथं होता.  </p>

Buy Now on CodeCanyon