Surprise Me!

पश्चिम महाराष्ट्रातील दिंडींनाच सुविधा, सुरक्षा मिळते, मराठवाड्याच्या दिंडींकडं सरकारचं दुर्लक्ष; एकनाथ महाराज यांचा आरोप

2025-06-22 27 Dailymotion

<p>नांदेड : श्री साधू महाराज यांनी निजामाच्या काळात भागवत पताका उंच केली. त्यांनीच आषाढीनिमित्त कंधार पंढरपूर पायी वारीची परंपरा सुरू केली. श्री साधू महाराज कंधारकर यांच्या दिंडीला सरकारकडून कुठलं सहकार्य नसल्याची खंत आठवे वंशज एकनाथ महाराज कंधारकर यांनी बोलून दाखवली. "सरकारकडं अनेक वेळा पाठपुरावा करून आम्हाला उत्तर मिळालेलं नाही. दिंडीकडं आरोग्य विभागानं सुद्धा दुर्लक्ष केलय. शासनाचा जीआर आहे की दिंड्यांना सोयी सवलती पूरवा आरोग्य विभागाकडं गेलं तर त्यांनीही दुर्लक्ष केलं. पोलीस विभागानं आम्हाला उडवा उडवीची उत्तरं दिली. सरकारकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे. पोलीस संरक्षण, आरोग्य आणि पाणी आम्हाला पाहिजे. आम्हाला काही अनुदान नको. सगळ्या सोयी सुविधा फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या दिंड्यांना आहे. आम्हाला कोणतीच सुविधा मिळत नाही," असं ज्ञानेश्वर महाराज कंधारकर यांनी सांगितलं. </p>

Buy Now on CodeCanyon