Surprise Me!

ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे झळकले बॅनर; तर बॅनरमध्ये आक्षेपार्ह काय?, शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार यांचा सवाल

2025-06-22 10 Dailymotion

<p>ठाणे : शहरातील टेंभी नाका परिसरात उद्धव ठाकरे यांना डीवचणारा बॅनर लागल्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी, ठाणे नगर पोलीस स्थानकातून थेट महापालिका उपायुक्तांना पत्र देण्यात आलं आणि हा बॅनर काढण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शिवसैनिकांनी याला विरोध केला. या बॅनरमध्ये आक्षेपार्ह काय आहे? हे त्यांनी सांगावं. एकनाथ शिंदे हे सर्व ठिकाणी स्वतः उपस्थित राहून मदत करणारे आहेत. उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुका लक्षात घेता भावनिक करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी केला आहे. महापालिकेचे अधिकारी कारवाई करण्यासाठी आल्यानंतर काही काळ त्या ठिकाणी तणावाचा वातावरण होतं. मात्र त्यानंतर महापालिकेचे अधिकाऱ्याने कर्मचारी कारवाई न करताच निघून गेले.</p>

Buy Now on CodeCanyon