Surprise Me!

शेतात ट्रॅक्टर चालवत असलेल्या शेतकऱ्याला बिबट्याने दिला फोटोसाठी वेळ; पाहा व्हिडिओ

2025-06-26 356 Dailymotion

<p>संगमनेर (अहिल्यानगर) : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द या गावात एक अद्भुत आणि थरारक दृश्य पाहायला मिळालं. गुरुवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजता साहेबराव दातीर यांच्या शेतात अभिषेक भवर हा तरुण शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरत होता. नांगरलेल्या जमिनीवर बगळे कीटक टिपत फिरत होते. परंतु, केवळ पाच फुटांवर असलेल्या उसाच्या शेतात बिबट्या आपल्या शिकाराची म्हणजे बगळ्यांची वाट पाहत दबा धरून बसलेला होता. अभिषेकच्या नजरेत हा बिबट्या आला आणि त्याने धीर न सोडता लगेचच आपला मोबाईल फोन काढून चित्रीकरण सुरू केलं. विशेष म्हणजे बिबट्याने कोणतीही घाबरगुंडी न दर्शवता अत्यंत शांततेने कॅमेऱ्यासमोर उभा राहत एक मिनिटांहून अधिक वेळ ट्रॅक्टर जवळ पोज दिली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये बिबट्या अत्यंत शांतपणे शेतात बसलेला दिसतो आणि त्यानंतर तो हळूहळू बाजूला जातो. हा प्रसंग पाहणाऱ्यांना आश्चर्यचकित करत आहे की, जंगलातील असा हिंस्र प्राणी एवढा संयमित होऊ शकतो? अशा प्रकारचा अनुभव थेट शेतात मिळणे हे दुर्मीळच. अभिषेक भवर याने दाखवलेले धैर्य आणि सजगता स्तुत्य आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी न होता ही घटना फक्त आठवणीत राहिली. परंतु वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराने शेतकरी वर्गामध्ये काळजी वाढली आहे.</p>

Buy Now on CodeCanyon