<p>पुणे : भाजपाचे सरचिटणीस प्रमोद कोंढारेनं महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विनयभंग केल्याच्या निषेधार्थ गुरूवारी 'गुलाबो गँग'च्या वतीनं भवानी पेठ इथं 'जोडे मार' आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपा पदाधिकारी नेते ओंकार कदम आणि प्रमोद कोंढरेला अटक व्हावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रमोद कोंढरे आणि ओंकार कदम यांच्या पोस्टरवर महिलांनी जोडे मारुन निषेध व्यक्त केला. "पुणे महानगरपालिकेच्या महिला अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बरोबर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गैरकृत्य केलं. त्याच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. भाजपाचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. प्रमोद कोंढरे याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी. त्याला अटक करावी, अशी आमची मागणी आहे," असं गुलाबो गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी सांगितलं. </p>