Surprise Me!

पुणे ते श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा पालखी सोहळ्याला सुरुवात, पाहा व्हिडिओ

2025-06-29 20 Dailymotion

<p>पुणे : श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीनं पुणे ते शिर्डी पायी पालखीला रविवारी सुरुवात झाली. यंदा पायी पालखी सोहळ्याचं 37 वे वर्ष आहे. रविवारी सकाळी सहा वाजता शिवाजीनगर येथील साई मंदिरात पादुकांना श्वेता आणि शिवम वीर यांच्या हस्ते मंगल स्नान आणि अभिषेक करण्यात आला. त्यानंतर कसबा गणपतीपासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय हवाई नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले, परमपूज्य योगाश्री शरद शास्त्री जोशी महाराज आणि समितीचे अध्यक्ष रमेश भोसले उपस्थित होते. 37 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पालखी सोहळ्यात यंदा दहा हजारहून अधिक साईभक्त सहभागी झालेत. नऊ जुलैला गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पालखी शिर्डीमध्ये पोहोचणार आहे. </p>

Buy Now on CodeCanyon