<p>पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगेतील भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांच्या मागणीला प्राधान्य देत व्हीआयपी दर्शन बंद केलं आहे. त्याचा परिणाम म्हणून भाविकांचा दर्शन रांगेतील बराच वेळ वाचत आहे. चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून पश्चिम द्वार ते चोपळा मार्ग एकेरी मार्ग म्हणून घोषित केलाय. मुख्यमंत्र्यांसमवेत व्हीआयपी गाड्यांचा ताफा येतो. त्यामुळं भाविकांना मोठी अडचण होते. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मंदिर परिसरात नो व्हेईकल झोन करण्यात आलाय. यामुळं भाविकांना विना-अडथळा बाहेर पडता आलं. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीसाठी 65 एकर परिसरात तब्बल पाच लाख भाविक दाखल झालेत, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलय. वाळवंट परिसर भक्तीरसानं फुलून गेलाय. वारकऱ्यांसाठी भीमा नदीची पाणी पातळी स्थिर ठेवण्यात आली आहे. भीमा नदीमध्ये पाणी असल्यानं वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.</p>