<p>शिर्डी : (Guru Purnima 2025) गुरूपौर्णिमेनिमित्त आज साईबाबा मंदिरात अनेक भाविकांनी हजेरी लावली. तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, "शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही आपल्याला गुरुस्थानी आहेत. दोन्ही गुरू अर्थात दोन्ही पवार एकत्र येण्याबाबतचा निर्णय अजित पवार घेतील". तर मी अजित पवार यांच्यासोबत असल्याचं चाकणकर यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर बुधवारी शाहपूर येथील एका खासगी शाळेतील जो प्रकार घडला तो निंदनीय असून संबधित मुख्यधापिकेसह एक महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आम्ही राज्य महिला आयोग म्हणून या कारवाईचा पाठपुरावा करत असल्याचं, रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं. </p>