Surprise Me!

घराणेशाहीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पाहा सुप्रिया सुळे यांची Exclusive मुलाखत

2025-07-14 103 Dailymotion

<p>पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर घराणेशाहीसंदर्भात टीका केली जात आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील घराणेशाहीवरून टीका होत आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामील होऊन सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रीपद दिलं जाणार अशी चर्चा सुरू आहे. या सर्व प्रश्नांवर आज 'ईटीव्ही भारत'चे संपादक सचिन परब यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. पुण्यात दिलेल्या या विशेष मुलाखतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील विविध प्रश्न तसंच केंद्रातील प्रश्न आणि नुकतंच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत देशाबाहेर जाऊन भारताची मांडलेली बाजू यावर सविस्तर 'एक्स्लुसिव्ह' मुलाखत दिली आहे.</p>

Buy Now on CodeCanyon