Surprise Me!

तब्बल 17 वर्षांनी भोसरीत झालं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन, पाहा व्हिडिओ

2025-07-20 3 Dailymotion

<p>पिंपरी (पुणे) : आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर जगतगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी तब्बल सतरा वर्षांनी भोजापूर अर्थात भोसरी गावात दाखल झाली आहे. तुकाराम महाराजांचा यावेळेस 375 वैकुंठ गमन सोहळा आहे. तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा 750 वा जन्म उत्सव सोहळा आहे. त्या निमित्ताने दोन्ही संस्थानाच्या प्रयत्नाने एक अनोखा योग जोडून आला आहे. यंदा तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी चिंचवडवरून सरळ देहू गावाकडं न जाता भोसरीवरून आळंदीकडं मार्गस्थ होणार आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचं पिंपरी आणि चिंचवड गावाच्या मुक्कामानंतर आज सकाळी भोसरी गावात आगमन झाला आहे. भोसरी गावातील लांडेवाडी या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीवर पुष्पवष्टी करून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. तर विलास लांडे यांनी स्वागताचं आयोजन केलं होतं.</p>

Buy Now on CodeCanyon