<p>बीड : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांनी विधानभवनामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, छावाचे विजयकुमार घाडगे यांनी थेट सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते फेकून जबाब विचारला होता. यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणि सुरज चव्हाण यांच्याकडून त्यांना मारहाण झाली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि सुरज चव्हाण यांच्या प्रतिमेवर पत्ते फेकून छावाच्या अशोक रोमन यांनी हे निदर्शने करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बीड पॅटर्न काय असतो तो सुरज चव्हाणला दाखवून देऊ आणि सुरज चव्हाण जिथे दिसेल तिथे त्याला चोप देऊ असा इशारा बीडच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.</p>