Surprise Me!

भामरागड तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला; पर्लकोटा नदी पुलावर पाणी, मुलचेरा तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर

2025-07-25 37 Dailymotion

<p>गडचिरोली : दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, आज गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असून, मुलचेरा तालुक्यातील सर्व शाळांना तसेच भामरागड तहसीलदार यांनी सुट्टी जाहीर केली आहे. तत्पूर्वी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे आलापल्ली येथील 17 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. रात्रीही मुसळधार पाऊस झाला. आता पावसाने उसंत घेतली असली तरी वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. त्यातच इंद्रावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पर्लकोटा नदी, लहान मोठ्या नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलंय. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड शहरालगत पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. पोलीस विभागाने पुलाजवळ बॅरिकेट्स लावले असून, आवश्यक बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात आलीय. पोलीस उपविभागीय अधिकारी अमर मोहिते, ठाणेदार दिपक डोंम्ब यांनी आपल्या बंदोबस्त टीमला सूचना दिलेल्या आहेत. इंद्रावती नदीच्या पाणी जोराने वाढत आहे, त्यामुळे इंद्रावती बॅक वाटर पर्लकोटा नदीच्या पाणी कधीही वाढू शकते, नदीलगतच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आलेय. </p>

Buy Now on CodeCanyon