Surprise Me!

मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी टँकर पलटी, मुंबई-गोवा महामार्गावर सात तास वाहतूक ठप्प

2025-07-29 8 Dailymotion

<p>रत्नागिरी-  हातखंबा गावाजवळील मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी रात्री उशिरा एलपीजी (द्रव पेट्रोलियम वायू) टँकर पलटी झाल्यानं वाहतूक विस्कळित झाली. अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण मार्गावरील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली.  संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून गॅसच्या कोणत्याही गळतीचा धोका टाळण्यासाठी तात्काळ विशेष तज्ञांच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. त्यांनी आधुनिक उपकरणांच्या मदतीने अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजित पद्धतीने गॅस ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया केली आहे. टँकर पलटी झाल्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक 7 तास ठप्प झाली होती. अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्यानं सरळ करण्यात आला. त्यानंतर गॅस दुसऱ्या सुरक्षित टँकरमध्ये हस्तांतरित करण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात  आलं. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहे.  रत्नागिरी जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कंपनीचे तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहिले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनानं आवाहन केलं आहे. </p>

Buy Now on CodeCanyon