<p>बीड : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती बीड जिल्हासह संपूर्ण राज्यात साजरी होत आहे. शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यात संगीत रजनी, विविध स्पर्धा, कथा आणि कांदबऱ्यांचं वाटप होणार आहे. तसंच बीड शहरात साहित्य दिंडीचं आयोजन केलं आहे. दिंडीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहलेल्या ग्रंथांचं प्रदर्शन होणार आहे. जयंतीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी अजिंक्य चांदणे यांनी केली आहे. "अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करतोय. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आम्ही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी राज्यातील खासदारांचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. यानंतर महायुतीचं सरकार आलं परंतु, तो प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारकडं गेला नाही," असं चांदणे म्हणाले.</p>