<p>नागपूर : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तब्बल १७ वर्षांनी या खटल्याचा निकाल जाहीर झाला आहे. मालेगाव इथं झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झालेला होता. भोपाळच्या माजी भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांच्या सह एकूण ७ आरोपींची विशेष एनआयए न्यायालयानं सुटका केली. या निकालाचे विश्व हिंदू परिषदे स्वागत केलं आहे. साध्वी प्रज्ञा आणि इतरांना खोटे आरोप लावून, फसविण्याचा प्रयत्न २००८ मध्ये झालेला होता. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी संसदेत भगवा आतंकवाद असं वक्तव्य केलं होतं. ते देखील न्यायालयानं फेटाळलंय. या प्रकाराचा षडयंत्र पुन्हा घडू नये यासाठी ज्यांनी हे प्रकरण घडवलं त्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री गोविंद शेंडे यांनी केली.</p>