<p>सातारा - कोकाटे साहेब अनुभवी नेते आहेत. खेळाचा त्यांना अनुभव असल्यामुळे खेळ व युवा खात्याचे त्यांना मंत्री केले आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला. रम्मी गेम प्रकरणानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषिमंत्री पद हे काढून दत्ता भरणे यांच्याकडं देण्यात आलंय. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना क्रीडामंत्री पद देण्यात आलंय. या विषयावरून आमदार रोहित पवार यांनी त्यांना टोला लगावला.</p><p>सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहून पुण्याकडे जाताना त्यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची गुलदस्त्यातील भूमिका, चौफुल्यातील गोळीबार प्रकरणी अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिलेली तंबी, यावरही भाष्य केलं.</p>