<p>राहुरी (अहिल्यानगर) : राज्यभरात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रक्षण करण्याचं वचन देत भाऊ हा बहिणीकडून राखी बांधून घेतो. बहीण देखील सदैव सोबत राहण्याचं वचन भावाला देते. लहान भाऊ-बहीण ज्या उत्साहानं हा सण साजरा करतात, त्याच उत्साहानं वयोवृद्ध भाऊ-बहीण देखील हा सण साजरा करत असल्याचं राहुरीत दिसून आलं. राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील एका 100 वर्षीय बहिणीनं आपल्या 104 वर्षाच्या भावाला राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला. 100 वर्षांच्या पार्वताबाई भुजाडी यांनी आपल्या 104 वर्षांच्या भावाला, हभप नारायण डौले यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. इतक्या ज्येष्ठ भावंडांनी राखी बांधण्याचा हा प्रसंग पाहून सर्वत्र आनंद आणि कौतुक व्यक्त झालं. नात्यांमधील प्रेम आणि जिव्हाळा वयाच्या सीमा ओलांडून सदैव टिकतो, हेच या प्रसंगातून दिसून येत आहे. </p>