Surprise Me!

रस्ता रुंदीकरणात शेकडो झाडांची कत्तल; कत्तल होत असलेल्या झाडांचे केले पुनर्रोपण, पाहा व्हिडिओ

2025-08-10 47 Dailymotion

<p>बीड : बीड ते परळी आणि अंबाजोगाई कळंब राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळं मार्गावरील हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. रुंदीकरणानंतर नवी रोपे लावण्यात येणार आहेत, अशी अफवाही निघालेला होती. मात्र, कुठेही झाडे लावताना दिसून येत नाही. मात्र, जी झाडे शंभर वर्षांपूर्वीची आहेत, अशा झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांना देखील पत्र दिलं. त्यामुळं आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून या झाडाचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला आणि कत्तल केलेली झाडे पुन्हा लागवड करत या झाडांना जीवदान देण्याचं काम करत आहोत, अशी माहिती, वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी दिली. तर पोकलेन मशीनने मोठा खड्डा करून झाड अलगत बाजूला काढण्यात आले. दुसऱ्या ठिकाणी 25 फुट रुंद आणि 15 फूट खोलीचा मोठा खड्डा करून त्यामध्ये गांडूळ खत टाकून जशास तसे मुळासकट खोड त्या खड्ड्यात लावण्यात आले. त्या वटवृक्षाचे पुनर्रोपण केल्यानंतर त्याची पूजा करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी "झाडे लावा झाडे जगवा" अशी घोषणाबाजी करण्यात आली.  </p>

Buy Now on CodeCanyon