Surprise Me!

वाल्मिक कराडला जामीन न मिळण्यासाठी जोरदार युक्तिवाद, पाहा उज्ज्वल निकम आणि धनंजय देशमुख काय म्हणाले...

2025-08-18 8 Dailymotion

<p>बीड : वाल्मिक कराडच्या वकिलांनी त्याला जामीन का मिळाला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला. त्याला आम्ही विरोध केला. त्याबाबतची कारणं देखील स्पष्ट केली. अनेक पुराव्यांकडं न्यायालयाचे लक्ष वेधले, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बीडमध्ये दिली. यावर 30 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.</p><p>"विष्णू चाटे याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा नाही हे म्हणण्यास अर्थ नाही. मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागतात, आरोपीला लागत नसतात. विष्णू चाटे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. खंडणीच्या प्रकरणात विष्णू चाटे याने वाल्मिकला सहकार्य केलं. वाल्मिकचा तो उजवा हात होता," असा युक्तिवाद मृत संतोष देशमुख यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.</p>

Buy Now on CodeCanyon