<p>बुलढाणा : श्रावण संपल्यानंतर रविवारी बुलढाण्यात मासे, मटन आणि चिकनच्या दुकानांवर तुंबळ गर्दी दिसून आली. श्रावणात मांसाहार टाळणाऱ्या अनेकांनी शनिवारी मांसाहार टाळला. रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं सकाळपासूनच बाजारात ग्राहकांची मोठी झुंबड उडाली. मंगळवारी हरतालिका आणि बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्यानं या काळात नागरिक मांसाहार टाळतात. त्यामुळं रविवार हा मांसाहारासाठी एकमेव दिवस आहे. ज्यामुळं दुकानांवर गर्दी उसळली. चिकनचे दर कमी झाले असून, सध्या 180 ते 200 रुपये प्रति किलो दराने चिकन उपलब्ध आहे. यामुळं चिकनच्या दुकानांवर नागरिकांची विशेष गर्दी आहे. मटणाचे दर मात्र स्थिर असून, 700 ते 800 रुपये प्रति किलो असा दर कायम आहे. मासे बाजारातही ताजी मासळी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रेलचेल दिसली. स्थानिक मच्छी मार्केटमध्ये पापलेट, सुरमई, बांगडा यांसारख्या माशांची मागणी वाढली आहे.</p>