Surprise Me!

मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या घरी कलेचा अधिपती बाप्पा विराजमान...

2025-08-27 1 Dailymotion

<p>नाशिक : छोट्या मोठ्या सर्वच घरांमध्ये सध्या बाप्पाचं आगमन झालंय. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर यांच्या घरीही यंदा लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात आणि श्रद्धेनं खांडकेकर कुटुंबानं बाप्पाचं स्वागत केलं. घरी सजावट,फुलांची आरास आणि मंगलमय वातावरणात गणरायाला विराजमान करण्यात आलं. गणपती हा कलेचा अधिपती असल्यानं यंदाच्या वर्षी कलेशी निगडित देखावा साकारण्याचा प्रयत्न खांडकेकर कुटुंबियांकडून करण्यात आलाय, याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेनं पर्यावरण पूरक देखावे साजरे करावे आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील महाराष्ट्राच्या जनतेला अभिनेता अभिजित खांडकेकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांनी केलं आहे. आज चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सनं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना या विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.</p>

Buy Now on CodeCanyon