<p>पुणे :<i> </i>आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) असल्याने राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला निरोप (Ganpati Visarjan 2025) दिला जात आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक जगभरात प्रसिद्ध आहे. 'गणपती बप्पा मोरया'... 'मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात आज आपल्या लाडक्या बाप्पाला पुण्यात देखील निरोप दिला जात आहे. पुण्यात सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याहस्ते सकाळी साडेनऊ वाजता आरती करत पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांचा गजर, मोरया मोरयाच्या जयघोषात मोठ्या संख्येने पुणेकरांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. तर मिरवणुकीत गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पाहा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा ड्रोन व्हिडिओ.</p>