<p>पुणे : अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) रोजी राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला निरोप (Ganpati Visarjan 2025) देण्यात आला आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक जगभरात प्रसिद्ध आहे. 'गणपती बप्पा मोरया'... 'मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाला पुण्यात देखील निरोप देण्यात आला. पुण्यात सकाळी साडे नऊ वाजता मानाच्या गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पुण्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक होत असून मिरवणुकीत विविध ढोल ताशा पथकाकडून वादन, तसेच शंखनाद आणि पारंपरिक अश्या पालखीत आणि आकर्षिक अश्या फुलांची सजावटीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. तर मिरवणुकीत गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पुण्याच्या या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीचे ड्रोन व्हिडिओ पाहा.</p>
