Surprise Me!

केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घेतलं साईबाबा समाधीचं दर्शन; राजकीय विषयावर बोलणं टाळलं

2025-09-11 13 Dailymotion

<p>शिर्डी (अहिल्यानगर) : केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गुरूवारी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "आज पहिल्यांदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलो आहे. साईबाबांचा महिमा खूप ऐकला होता. मात्र शिर्डीला येणं होत नव्हतं. आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येण्याचा योग आला. साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाला समाधान आणि शांती मिळाली." असं ते म्हणाले. नेपाळमधील परिस्थितीवर प्रसारमाध्यमांनी ऊर्जा मंत्री मोहनलाल खट्टर यांना विचारलं असता ते म्हणाले, "कोणतंही दुःख आणि विघ्न असेल अशा लोकांनी शिर्डी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं तर सगळी दुःखं दूर होतात. सर्वांचं दुःख साईबाबा दूर करो. सध्या कोणत्या प्रकारची अशांती आहे ती शांत होवो," अशी प्रार्थना करत केंद्रीय मंत्री खट्टर यांनी नेपाळमधील परिस्थितीवर भाष्य केलं. पहिल्यांदाचं शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी खट्टर आल्यानं त्यांनी राजकीय विषयांवर बोलण्यास टाळलं. यावेळी साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला आहे.</p>

Buy Now on CodeCanyon