Surprise Me!

सरकारच्या निष्क्रियतेचा भरत कराड हा ओबीसी बांधव बळी, संभाजी ब्रिगेडचा आरोप

2025-09-12 1 Dailymotion

<p>पुणे - लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यावरून आता संभाजी ब्रिगेड संघटनेनं राज्य सरकारवर जोरदार टीका करत सरकारच्या निष्क्रियतेचा भरत कराड हा ओबीसी बांधव बळी गेला असल्याचा आरोप केला आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे म्हणाले की, सरकारनं महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी किंवा ओबीसीविरुद्ध मराठा हा वाद जाणीवपूर्वक लावण्याचं कारस्थान केलेलं आहे. त्यासाठी काही सुपारी बहाद्दर खास करून मराठवाड्यात फिरवले जात आहेत. सरकार टिकणारं आरक्षण देऊ शकत नसेल तर तरुणांच्या जीवाशी खेळण्याचा सरकार अत्यंत घाणेरडा प्रयत्न करत आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला आपले मूलभूत हक्क अधिकार दिलेले आहेत. वैफल्यग्रस्त अवस्थेतून तणावाखाली जर तरुण स्वतःचे प्राण देत असतील, आत्महत्या करत असतील तर हे सरकारचं अपयश आहे. स्वतःची मुलंबाळं, कुटुंब रस्त्यावर येत आहेत, याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. भरत कराड यांच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार जबाबदार आहेत. खरं तर सरकारवर मनुष्यवधा चा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे, असं यावेळी शिंदे यांनी सांगितलं.</p>

Buy Now on CodeCanyon