<p>पुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, भजन, नृत्य आणि संगीताचा संगम असणारा पुणे नवरात्रौ महोत्सवाचे यंदा ३१वं वर्ष दिमाखात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २२ सप्टेंबरला सायंकाळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच इथं होणार आहे. यंदा मदुराई इथल्या मीनाक्षी मंदिराचा भव्य देखावा साकारला जात आहे. यासाठी दक्षिणेतील सुमारे ८० कलावंत या देखाव्याचं काम करत आहेत, अशी माहिती आयोजक आबा बागूल यांनी दिली. या उद्घाटन सोहळ्यात कलाकार भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, शितल अहिरराव, राधा सागर, सिया पाटील, ऋजुता जुन्नरकर, अमृता धोंगडे, वैष्णवी पाटील यांची उपस्थिती असणार आहे. या महोत्सवाचे कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात. तर घटस्थापनेच्या दिवशी शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात आबा बागुल आणि जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी ६.४१ या शुभमुहूर्तावर घटस्थापना होणार आहे. </p>