Surprise Me!

पुरात अडकलेल्यांसाठी आमदार रोहित पवार मध्यरात्री मदतीला; पुरामध्ये उतरून नागरिकांची केली सुटका

2025-09-24 1 Dailymotion

<p>पुणे :  मुसळधार पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अनेक गावांचा संपर्क तुटला असून ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशीच परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यात दिसून आलीय.  कर्जत तालुक्यातील मलठणमधील जिराफ वस्तीभोवती सीना नदीचं (Sina River) पाणी आलं. त्यामुळे  काही नागरिक अडकले होते. यावेळी आमदार रोहित पवार यांनी तत्काळ तिथं भेट देत पुराच्या पाण्यातून नागरिकांची मदत केली. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला आमदार रोहीत पवार यांनी बोलावलं. सुरूवातीला अडकलेल्या महिला भगिनींची सुटका केली. पण, काही शेतकरी त्यांची जनावरे तिथंच असल्यानं ते बाहेर येत नव्हते.  यानंतर रोहित पवार यांनी एनडीआरएफच्या टीमसोबत जाऊन सर्वांना विश्वासात घेतले. त्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढलं. </p>

Buy Now on CodeCanyon