Surprise Me!

मालकीचा प्लॉट विकून आमदार संजय गायकवाड यांची पूरग्रस्तांना 25 लाखांची मदत

2025-09-30 3 Dailymotion

<p>बुलढाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्वतःच्या मालकीचे दोन प्लॉट विकून 25 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती, पिके आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत गायकवाड यांनी हा पुढाकार घेतला आहे. त्यांनी डीडीद्वारे ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली.</p><p>गायकवाड यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर इतर दानशूर व्यक्ती आणि संस्थांना देखील पूरग्रस्तांसाठी पुढे येऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या कृतीमुळे समाजात सामाजिक एकतेचा संदेश गेला आहे. अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके उद्ध्वस्त झाली, घरांचे नुकसान झाले आणि अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहेत. अशा परिस्थितीत गायकवाड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींची मदत शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.</p>

Buy Now on CodeCanyon