Surprise Me!

साईबाबा पुण्यतिथीनिमित्त 'भिक्षा झोळी' कार्यक्रम, संस्थानच्या अधिकाऱ्यांसह माजी मंत्री अन् भाविक सहभागी

2025-10-02 4 Dailymotion

<p>शिर्डी : साईबाबांना वंदन करत हजारो भाविकांनी आज दारोदार फिरून भिक्षा मागितली. 'भिक्षा दे माई' या बाबांच्या शैलित गळ्यात झोळी घेऊन साई संस्थानच्या अधिकाऱ्यांसह देशभरातून आलेल्या साईभक्तांनी साईबाबाच्या प्रती आपली भक्ती प्रकट केली आहे. गेल्या 107 वर्षापासून ही अखंड परंपरा आजही सुरू आहे.</p><p>श्रद्धा-सबुरीचा महामंत्र देणाऱया साईबाबांनी 15 आँक्टोबर 1918 साली दसऱयाच्या दिवशी महासमाधी घेतली. साईबाबांची जीवनशैली अत्यंत साधी, सरळ होती. पाच घरी भिक्षा मागून जे मिळलं ते अगोदर पशुप्राण्यांना आणि भुकेलेल्यांना वाटून देत असत आणि नंतरच स्वत: ग्रहण करत असत. आजही साईबाबा संस्थाननं बाबांच्या भिक्षा झोळीची परंपरा अविरतपणे सुरू ठेवलीय. भिक्षा झोळी आगमनाअगोदर महिला रांगोळीने रस्ता सजवतात, तर निषाणाची आरती करून हळद-कुंकू वाहून भिक्षेकऱयांचं स्वागत केलं जातं.</p>

Buy Now on CodeCanyon