<p>बीड : बीड जिल्ह्याच्या राजकारणाला नवा दिशा देणाऱ्या दिवंगत केशरबाई क्षिरसागर यांचे 19 वे पुण्यस्मरण आज बीड येथे पार पडले. त्यांच्या स्मृतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात जयदत्त क्षिरसागर यांनी केशरबाई क्षिरसागर यांच्या कार्यकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला.राजुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून ते पंचायत समितीच्या सभापती, आमदार आणि खासदार अशी मजल मारत केशरबाई या बीड जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार ठरल्या. सामाजिक सलोखा राखत, जातीपातीच्या राजकारणाला बगल देत त्यांनी एक वेगळाच राजकीय वारसा निर्माण केला.शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या केशरबाई यांचा पहिला पगार फक्त 27 रुपये होता. घरची अत्यंत हालाखीची परिस्थिती, "सकाळी खाल्लं तर संध्याकाळी चूल पेटेल का?" अशी चिंता असतानाही त्यांनी संघर्षाला तोंड देत राजकारणात पाऊल टाकलं.</p>
