<p>बीड : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचं मोठं नुकसान झालं असून, अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यामुळं शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळं शेतकरी उध्वस्त झाला आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्याला 2019 ला तुम्ही मुख्यमंत्री असताना तीन पट नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय काढला होता, त्यानुसार नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी नेते सी.बीए.स इनामदार यांनी केली आहे. तसेच विरोधक शेतकऱ्यांचं ऐकलं नाही तरी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालाचा तरी अवमान करू नका, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नुकसान भरपाई न दिल्यास पुन्हा कोर्टामध्ये जाणार असल्याचाही त्यांनी सांगितलं.</p>