<p>पुणे : पुणे शहरात राज्याचे विविध नेते मंडळी दौऱ्यावर असताना सर्वसामान्य नागरिक हे त्यांचे विविध प्रश्न घेऊन त्या-त्या नेते मंडळींना निवेदन देत असतात आणि त्या-त्या नेत्यांसमोर प्रश्न मांडत असतात. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर असताना एका आजीने थेट सुप्रिया सुळे यांना टीव्ही सिरीयल सुरू असताना सतत येणाऱ्या जाहिरातींबाबत थेट तक्रार केली आणि सांगितलं, "३० मिनिटांच्या सिरीयलमध्ये मोठ-मोठ्या प्रमाणात जाहिराती येत असून याबाबत आपण काहीतरी करा", असं म्हणताच खासदार सुप्रिया सुळे या हसू लागल्या आणि यानंतर त्यांनी त्या आजींचं सविस्तर म्हणणं ऐकून घेत याबाबत मी माहिती घेते असं त्यांनी सांगितलं. आता या आजीबाईंना पडलेला प्रश्न सिरीयल पाहणाऱ्या तमाम रसिकांनाही पडलेला आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे काय उपाय करतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.</p>
