Surprise Me!

ऑक्टोबर महिन्यात हिट जाणवणार का? तज्ज्ञ म्हणतात...

2025-10-08 0 Dailymotion

<p>पुणे : राज्यात मागच्या महिन्यात मराठवाड्यासह इतर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. आता ऑक्टोबर महिना सुरू झाला असून, या ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हिट पहिल्याच आठवड्यापासून पुण्यासह राज्यातील इतर भागात अनुभवायला मिळत आहे. असं असताना ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअस तापमान कमी असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याबाबत हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितलं की, ऑक्टोबर महिना सुरू झाला असून, येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअस तापमान कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान हे सामान्य असणार असून, कमी प्रमाणावर राहील. 30 ते 34 अंश सेल्सिअस एवढं तापमान राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात ज्या भागात ज्यात हिट असते, तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. त्यामुळे यंदा तापमान कमी राहण्याची शक्यात असून, काही ठिकाणी दुपारपर्यंतच्या हिट राहण्याची शक्यता असल्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. </p>

Buy Now on CodeCanyon