<p>बीड : गेल्या काही वर्षांपासून कोरडेवाडी व परिसरातील शेतकरी, कामगार, महिला आणि विद्यार्थी विविध समस्यांशी लढा देत आहेत. पाणीटंचाई, आर्थिक संकट, शिक्षणासाठीची धडपड अशा अनेक गोष्टींची अडचण आहे. याविरोधात राजेश्री उंबरे यांनी 03 ऑक्टोबर 2025 पासून कोरडेवाडी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषण पूर्णपणे शांततामय आणि संविधानिक मार्गाने सुरू असून, यामध्ये हजारो गावकरी, शेतकरी, महिला, युवक यांचा सहभाग आहे. मात्र, उपोषणाला ६ दिवस झाले तरी प्रशासन, आमदार, खासदार वा कोणताही जबाबदार प्रतिनिधी भेट देण्यास तयार नाही, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय. कोरडेवाडीतील नागरिक संतप्त झाले असून, केज तहसील कार्यालयासमोर बैलगाडी पेटवत सरकारचा निषेध व्यक्त केला.</p><p>सध्या राजेश्री उंबरे यांची तब्येत खालावली आहे. परंतु, कोणतंही अधिकृत वैद्यकीय पथक तिथे पाठवण्यात आलं नाही. प्रशासनाची ही निष्क्रियता मानवाधिकारांचे उल्लंघन असून, ती लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय. </p>