<p>बीड : सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच बीड नगरपरिषद ही राज्याच्या निवडणुकीत एक महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. गेली 40 वर्ष क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषदेच्या माध्यमातून बीड शहरातील अनेक विकासाची कामं केली गेली, असं स्थानिकांचं मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ योगेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडणार आहे.</p><p>बीड शहराच्या विकासासाठी विकासात्मक अजेंडा आम्ही नजरेसमोर ठेवलाय. बीड नगरपरिषदेवर गेली अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत. सर्वसामान्य नागरिकांचा विकास डोळ्यासमोर ठेवून विकास कामे करत आहोत. आमच्या समविचारी पक्षांना विचारात घेऊन ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढली जाणार आहे. मात्र, बीड शहरातील नगरपरिषदेचा अध्यक्ष हा अजित पवार यांच्या पक्षाचाच असणार आहे, असा दावा डॉ योगेश क्षीरसागर यांनी केला आहे. </p>
