Surprise Me!

मंत्री छगन भुजबळ यांना बीडमध्ये पायही ठेवू देणार नाही, मराठा समन्वयक आक्रमक

2025-10-11 13 Dailymotion

<p>बीड : मंत्री छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करण्यासाठी बीडमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांना बीडमध्ये पायही ठेवू न देण्याचा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिलाय. मंत्री छगन भुजबळ हे बंजारा, धनगर किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आले असते तर आम्ही विरोध केला नसता. परंतु, ते मंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी येत असून, त्याला आमचा विरोध आहे. त्यांनी बीडमध्ये येण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला तरी देखील आम्ही गनिमी काव्याने त्यांना विरोध करणारच असल्याची भूमिका मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी मांडली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये 17 ऑक्टोबर रोजी ओबीसी मेळावा होणार असून, या पार्श्वभूमीवर आता बीडमध्ये वातावरण तापल्याचे दिसत आहे.</p>

Buy Now on CodeCanyon