<p>बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील आगर नांदूर या गावाला गोदावरीच्या पुराचा फटका बसला होता. या गावातील शंभरहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्यानं त्यांचे मोठं नुकसान झालं होतं. गावातील ूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पुण्यातील समर्थ युवा प्रतिष्ठाननं पुढाकार घेतला. या पुरग्रस्तांची दिवाळी गोड व्हावी यासाठी नागरिकांना किराणा मालाच्या किटचं वाटप करण्यात आलं. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. समर्थ युवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. "आम्ही सकाळपासून परिसरात फिरत आहे. कापूस, ऊस अशा इथल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानाची भरपाई आपण करू शकत नाही. सरकर आपल्या माध्यमातून मदत करेल. पण नागरिकांचा ताण आणि दु:ख कमी करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. राज्यातील नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार गावांमध्ये येऊन मदत करावी," असं आवाहन अमित गावडे यांनी केलं. </p>
