Surprise Me!

संकटात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी वारकरी करतायेत प्रबोधन, पाहा व्हिडिओ

2025-10-12 4 Dailymotion

<p>बीड : जिल्ह्यात 'ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी'च्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे. आज बीडमध्ये दाखल झालेल्या 'ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी'मध्ये हजारो महिला, पुरुष वारकरी सहभागी झाले होते. या वारकऱ्यांना आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक शपथ देण्यात आली. बळीराजाला पुन्हा उभा करण्याचं मोठं आ्व्हान सर्वांसमोर आहे.</p><p>बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या दिंडीला सुरुवात होऊन सामाजिक न्याय भवन या ठिकाणी या दिंडीचा समारोप झाला. "अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे धीर खचलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी आणि आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी संत विचारातून जागृती करत आहोत. संतांच्या विचारातून आत्महत्या रोखतील," असा विश्वास वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी) यांनी व्यक्त केला.</p>

Buy Now on CodeCanyon