Surprise Me!

जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणं देशासाठी घातक - खासदार सुप्रिया सुळे

2025-10-16 1 Dailymotion

<p>पुणे : राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जातीजातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करणे संविधान विरोधी असून, ते देशासाठी आणि भावी पिढ्यांसाठी घातक आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.  </p><p>यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "विविधता हे भारताचे वैशिष्ट्य आहे आणि बलस्थानही आहे. जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करणे घटनेच्या विरोधात आहे. हा तेढ नष्ट करून एकी कायम ठेवण्यासाठी अपप्रवृत्तीच्या विरोधात संपूर्ण समाजाने संघर्ष करणे आवश्यक आहे. मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. महाराष्ट्र राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. शिवभोजन थाळीचे पैसे तब्बल आठ महिन्यांपासून दिले गेलेले नाहीत. त्यामुळे शिवभोजन थाळी पुरविणाऱ्या महिलांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून तब्बल 25 लाख महिलांना वगळण्यात आले आह."</p>

Buy Now on CodeCanyon