Surprise Me!

बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा : आमचा विरोध मेळाव्याला नाही, तर भुजबळांच्या भूमिकेला - गंगाधर काळकुटे

2025-10-17 0 Dailymotion

<p>बीड : समता परिषद आणि सकल ओबीसी समाजाच्यावतीनं आज बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ मार्गदर्शन करणार आहेत. तसंच, या मेळाव्याला धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात मंत्री भुजबळ काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.</p><p>ओबीसी मेळाव्याला नाही, भुजबळांच्या भूमिकेला विरोध : या ओबीसी मेळाव्याबाबत मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी स्पष्ट केलं, "आम्ही कधीही ओबीसींच्या कुठल्याही मेळाव्याला विरोध केला नाही. मात्र, मंत्री छगन भुजबळ हे केवळ मराठा समाजाला विरोध म्हणून या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. बीडमध्ये मराठा-ओबीसी वाद वाढावा यासाठी ते हा मेळावा घेत आहेत. मंत्रिपदावर असताना असे कृत्य ते करत आहेत, त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे".</p>

Buy Now on CodeCanyon