<p>बीड : मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसानं झोडपून काढल्यानंतर शेत जमीन आणि पिकांसह अनेकांची स्वप्नदेखील या पुरात वाहून गेलीत. या संकटातून सावरण्यासाठी शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेनं मदतीचा हात दिला आहे. बीड तालुक्यातील इमामपुर भागातील पुरग्रस्तांसह, ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त किराणा किटचं वाटप करण्यात आलं. यामध्ये खाद्यपदार्थांसह, कपडे, दिवाळीचं साहित्य आणि फटाकेदेखील देण्यात आले. युवासेनेचे पदाधिकारी बाजीराव चव्हाण आणि महंतांच्या हस्ते या किटचं वाटप करण्यात आलं. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पूरग्रस्तांशी संवाद साधला. तसंच सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तर मराठवाड्यात आत्तापर्यंत 80 हजार किट वाटप केल्याची माहिती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.</p>