<p>पुणे : आज वसूबारस, आजपासून सर्वत्र दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात सर्वत्र निवडणुकीची तयारी सुरू आहे. असं असताना आज पुण्यातील वाडेश्वर कट्टा येथे सर्वपक्षीय फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवाळी फराळ कार्यक्रमाला सर्वपक्षीय शहराध्यक्ष उपस्थित होते. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे हे सर्वपक्षीय नेते आज दिवाळी फराळ कार्यक्रमाला एकत्र आले असता, सर्वप्रथम या नेत्यांनी एकमेकांना लाडू भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि हीच आमची संस्कृती असून आम्ही ही संस्कृती अशीच जपत राहणार असल्याचं सांगितलं. यावेळी या नेत्यांनी दिवाळी फराळ खाता-खाता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत एकत्र यायची ऑफर देखील दिली. यावेळी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने या शहराध्यक्ष यांच्याशी बातचीत केली.</p>